*प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका, कोणी आपला* *कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या.. "आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही"... हे* *वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका...* *"काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर ,* *घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते"...* *- तथागत गौतम बुद्ध*
Posts
- Get link
- X
- Other Apps
*प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच....* ______________________________ *कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.* *मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.... त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.* *सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घ...
- Get link
- X
- Other Apps
🍁⭐🍁⭐🍁⭐🍁⭐🍁 *====================* *🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺* 📚✍🏻📕📗🗞📖🗃 *०१) ययाती* = वि. स. खांडेकर *०२) वळीव* = शंकर पाटील *०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर *०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती *०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात *०६) यक्षप्रश्न* = शिवाजीराव भोसले *०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर *०८) तीन मुले* = साने गुरुजी *०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे. *१०) आय डेअर* = किरण बेदी *११) व्यक्तिमत्त्व संजीवनी* = डॉ. वाय. के.शिंदे *१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत *१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे *१४) राजा शिवछत्रपती* = बाबासाहेब पुरंदरे *१५) बुद्धीमापन कसोटी* = वा. ना. दांडेकर *१६) पूर्व आणि पश्चिम* = स्वामी विवेकानंद *१७) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव* = स्वामी विवेकानंद *१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू *१९) आरोग्य योग* = डॉ. बी.के.एस. अय्यंगार *२०) अंधश्रधा* : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर *२१) लोकमान्य टिळक* = ग. प्र. प्रधान *२२) राजयोग* = स्वामी विवेकानंद *२३) तरुणांना आवाहन* = स्वामी विवेकानं...
- Get link
- X
- Other Apps
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - सर्दी, खोकला, ताप येत नाही. २) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही. ३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही. ४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही. ५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे. मुलांना देणे. ६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही. 7) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे. 8) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे - हाडे मजबूत होतात. 9) ऐकू न येणे - चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेम्ब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस ...
- Get link
- X
- Other Apps
*गैरसमज*.......हा शब्दच खूप गैर वाटतो.. *स्वामी विवेकानंदांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे....* एका जंगलात राम सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.; एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरलेल मुंगूसाच पिल्लू दिसत जवळच कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती..राम त्या पिल्लाला घरी आणतो.थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या सदस्यां प्रमाणे रूळते... एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि निघून जातो... नंतर थोड्या वेळाने आपल्या बाळाला झोपवून सावित्री पाणी आणण्यासाठी निघून जाते.घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस.... काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला ...मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई..साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्य...